PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Feb. 2, 2024   

PostImage

नातवाचं वाढदिवस अन मुख्यमंत्री दवाखान्यात दाखल


 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा वाढदिवस साजरा होत असताना,दुसरीकडे आजोबा दवाखान्यात दाखल झाले.प्रकृती स्थिर आहे चिंता करण्याची गरज नाही,असं डॉक्टरांचा म्हणणं आहे.

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मुलगा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात सुरू होता. अन्न त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेतील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ यांच्या दवाखान्यात दाखल झाले.

त्यांना डोळ्याचा खूप दिवसांपासून त्रास होता आणि चष्म्याचा नंबर सुद्धा वाढला होता परंतु राज्याच्या राजकारणा पलीकडे आपल्या तब्येतीला जपले नसताना.आता मात्र जास्त त्रास होऊ लागल्यामुळे,आपले आजचे सर्व कार्यक्रमांना स्थगिती देत,थेट दवाखान्याचा मार्ग पत्करला,हे मात्र विशेष.

जे बोलतो ते करतो या विचाराचे असून.मी दिलेल्या शब्दाला जगणारा माणूस आहे, अशी प्रतिक्रिया स्वतः मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा आंदोलनावेळी व्यक्त केली होते.राज्याच्या वाढत्या कामाचा व्याप यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत यशस्वीपणे आपले कामगिरी पाडण्यात ते दक्ष आहेत,हे यावरून दिसून येतोय.

 

नातवांचा जिव्हाळा,नातवांच कौतुक करणं हे प्रत्येक आजोबाचे कर्तव्य आणि अधिकार आहे. परंतु आज परिस्थिती त्याच पद्धतीचा असल्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची नातवापेक्षा जास्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे,हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येतोय.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या डोळ्याचे उपचार करून घेण्यासाठी आज दवाखान्यात दाखल झाले असून.त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून यात चिंता करण्यासारखं काहीही नाही,असं डॉक्टरांच म्हणणं आहे.

 

णखी वाचा : "एकनाथाने" मांडिले दुकान

 

विशेष म्हणजे याच महिन्यात ९ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून,त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वाढदिवसाची उत्सुकता लागली असून ठिकठिकाणी तसे बॅनर देखील झळकताना दिसत आहे.साहेब लवकर बरे होऊन घरी या,अशी आर्त हाक मुख्यमंत्र्यांच्या चाहत्यांनी बोलून दाखवली असून.साहेब लवकरच घरी परत येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.